रसिक श्रोत्यांमुळे उत्तम सूत्रसंचालिका

Pooja-Thigale
Pooja-Thigale

कार्यक्रमांचे आकर्षकरीत्या अँकरिंग करून रसिकांना खिळवून ठेवणे, हे कार्य करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ या स्वनिर्मित कार्यक्रमामध्ये आजतागायत १५२ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहेत.

प्रत्येकाला वाटते की, जीवनात आपले एक विश्‍व असावे, ज्याचे आपण राजे असावे. आपण राजे असावे, पण त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. उत्तम गुरूंचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे आणि आपण त्याला प्रामाणिकपणाची जोड दिली पाहिजे. मला घडवणारे माझे गुरू अर्थात माझे वडील म्हणजेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदक सुनील थिगळे हे होय! 

मी आज गेली दहा-बारा वर्षे निवेदिका म्हणून कार्य करत आहे. सूत्रसंचालन एक उत्तम करिअर होऊ शकते, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते. उत्तम आवाज, रोजचे वाचन, अभ्यास व सूत्रसंचालनाचे शास्त्र, हे पैलू आपल्याकडे असतील; तर तुम्ही एक उत्तम निवेदक होऊ शकता. मी स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले व सातत्य ठेवून अभ्यास व मार्गदर्शन घेत राहिले. त्यामुळेच आज माझ्या व पप्पांच्या सहा महिने अगोदर तारखा बुक आहेत. मी बी.कॉम.; बी.एड. केले, तरी हे क्षेत्र निवडलं व स्वतःला सिद्ध केले आहे. 

आज माझ्यासारखे निवेदक बनावे म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत. ही काळाची गरज ओळखून माझे वडील सुनील थिगळे यांनी ठरवले की, आपण नवीन येणाऱ्यांसाठी ॲकॅडमी सुरू करायची व मुले घडवायची. त्यानुसार २१ जानेवारी २०१८ रोजी राजगुरुनगर येथे ‘शब्दब्रह्म’ ही भाषण व सूत्रसंचालन प्रशिक्षण देणारी ॲकॅडमी सुरू केली. आजपर्यंत शेकडो मुले भाषण व सूत्रसंचालन करू लागली आहेत. मी आजपर्यंत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा हजारो कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड, ज्ञानेश्‍वर मेश्राम, ज्योती गोराणे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर यांचे कार्यक्रम केलेले आहेत. राजकीय समारंभात नामदार शरदचंद्रजी पवार, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार दिलीपराव मोहिते पाटील, सुरेशभाऊ गोरे अशा दिग्गज नेत्यांच्या सभा व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांसह अनेक चित्रपट अभिनेते व अभिनेत्री, साहित्यिक, लेखक, गायक आदी कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.

काळाची गरज ओळखून ‘शब्दब्रह्म इव्हेंट्‌स’ हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही समारंभासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी दिले जाते. ‘समारंभ तुमचा नियोजन आमचे’ असे ब्रीदवाक्‍य घेऊन हा व्यवसायदेखील सुरू आहे. व्यवसाय कोणताही असो, सचोटीने व प्रामाणिकपणे केला, तर यश मिळतेच, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. 

मी डी डी सह्याद्री व टीव्हीवर निवेदिका म्हणून काम करीत आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री या कार्यक्रमाचे ५२ एपिसोड झालेले आहेत. मी साम टीव्हीवर इंटर्नशिप केलेली आहे. कार्यक्रमांचे आकर्षकरीत्या अँकरिंग करून रसिकांना खिळवून ठेवणे, हे कार्य करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते.

म्हणूनच ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ या स्वनिर्मित कार्यक्रमामध्ये आजतागायत १५२ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहेत. शिवाय सेलिब्रेटी गप्पांमध्ये परिणीती चोप्रा, महिमा चौधरी, चित्रांगदा सिंग, बिपाशा बासू अशा बॉलिवूड, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, अनिता दाते, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, तेजश्री प्रधान, अंकुश चौधरी, अभिजित खांडकेकर यांची मुलाखत लाइव्ह कार्यक्रमात घेतली आहे. 

माझे वडील व गुरू प्रसिद्ध निवेदक सुनील थिगळे, माझी आई साधना, माझी बहीण मेघा आणि या क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी मला पाठिंबा दिला; प्रोत्साहन दिले, म्हणूनच मी एक उत्तम सूत्रसंचालिका आणि निवेदिका होऊ शकले आहे. तसेच, मी हे श्रेय माझ्या सर्व रसिक श्रोते यांनाही देऊ इच्छिते. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत एक मुलगी संपूर्ण कार्यक्रम माईक हातात घेऊन हॅण्डल करते, वेळोवेळी काही महत्त्वपूर्ण सूचना करते. आजूबाजूला अनुभव आणि ज्ञानाने वयाने मोठी मंडळी असताना माझ्यासारख्या युवतीला सर्व मायबाप रसिकांनी स्वीकारले, म्हणून मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद! 

शब्दब्रह्म कॅरिअर्स, शब्दब्रह्म ऑडिओज, शब्दब्रह्म इव्हेंट्‌स या माध्यमातून माझ्यासारख्या होतकरू व कलासंपन्न असलेल्या मुला-मुलींना या प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न कायम असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com