शैक्षणिक क्रांतीची तेजोमय मशाल

Rohini-Deshmukh
Rohini-Deshmukh

विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळांची जबाबदारी रोहिणीताई सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताईंना ‘सकाळ मधुरांगण’च्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

चाकण (ता. खेड) येथील रोहिणी शामराव देशमुख यांना शिक्षणक्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यांचे सासरे, उद्योजक, ज्येष्ठ नेते एस. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने रोहिणी यांनी परिसरातील मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे या उद्देशाने विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची स्थापना २००४ मध्ये केली. या शाळेत नर्सरीपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षणाची सोय आहे. २०१५-१६ मध्ये सीबीएससीच्या शाळेची चाकणमध्ये गरज लक्षात घेऊन सीबीएससीच्या विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेच्या भव्य अशा इमारतीचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी पवार यांनी शाळेबद्दल तसेच रोहिणीईंच्या शिक्षणक्षेत्रातील धडपडीबद्दल गौरवोद्‌गार काढले. 

आज संस्थेच्या सर्व शाळांमधून सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोहिणी यांनी परदेशातील विविध शाळांना भेटी दिल्या आहेत. त्या शाळेची गुणवत्ता, अत्याधुनिक शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांची प्रगती याकडे बारकाईने लक्ष देतात. परदेशातील शिक्षणातील चांगल्या गोष्टी आपल्याकडे आपल्या शाळेत आणण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण झाली आहे.

रोहीणीताईंचे हसतमुख व्यक्तिमत्त्व शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना नेहमीच प्रेरणा देत असते. जे काय शिक्षणात नवीन आहे ते आत्मसात करून शाळेतील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा रोहीणीताईंचा नेहमी प्रयत्न असतो. रोहीणीताईंचे शिक्षण डीएसएम, बी. कॉम, एम. ए., एम. एड, पी. जी. डी, पी. सी. असे झाले आहे. रोहीणीताईंचे पती शामराव हे एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच रोटरी क्‍लब चाकणचे माजी अध्यक्ष आहेत. शामराव यांचे मार्गदर्शन नेहमी त्यांना मिळते. रोहिणीताईंच्या नवनव्या कल्पना शाळेत राबविण्यासाठी त्यांच्या पतीची नेहमी त्यांना साथ असते. रोहिणीताईंचा मुलगा अक्षय हा उच्चशिक्षित असून, व्यावसायिक आहे. तोही त्यांना नेहमी मदत करतो. रोहिणीताईंची सून हर्शल ही बी. ई. कॉम्प्युटर, एम. बी. ए (लंडन) झाले आहे. हर्शल या संस्थेच्या सचिव म्हणून कामकाज पाहतात. 

रोहिणीताई या विद्यानिकेतन, विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूल या शाळेची जबाबदारी सांभाळत आहेत. जबाबदारी सांभाळताना विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची धडपड आहे. रोहिणीताई यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सकाळ मधुरांगणच्या वतीने चाकणच्या उत्कृष्ट संयोजिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. चाकणच्या नवयुग मंडळाच्या वतीने चाकण शहरातील शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच काव्यमित्र संघटना पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रोहिणीताई जिजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. पुढील काळात महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र तसेच वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. चाकण शहराच्या वाढत्या कचरा समस्येवर नियंत्रण करण्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com