यशस्वी व्यावसायिक व महिलांची ‘सखी’

Shweta-Tambe
Shweta-Tambe

पतीच्या मार्गदर्शनाखाली श्‍वेता तांबे यांनी ‘स्वामी मेडिकल स्टोअर्स’ नावाने दुसरे दुकान सुरू करून व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच सखी महिला बचत गट स्थापन केला व महिलांना एकत्र आणले. सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.

ओतूर गावचे सरपंच संतोष देविदास तांबे यांच्या पत्नी श्वेता संतोष तांबे यांनी एक आदर्श मुलगी, आदर्श गृहिणी, एक उत्तम उद्योजक व पतीला त्यांच्या कार्यात भक्कम साथ देणारी सहचारिणी; तसेच सामाजिक भान असलेली एक सामाजिक कार्यकर्ता अशा विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

नगर जिल्हातील अकोले तालुक्‍यातील निळवंडे हे मूळ गाव असलेल्या आभाळे कुटुंबातील श्वेता यांचा जन्म त्यांच्या मामाच्या गावी अकोले येथे झाला. टाकेद जिल्हा नाशिक येथे बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वडील शिवनारायण गंगाराम आभाळे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या करड्या शिस्तीत श्वेता यांचे बालपण घडले. उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण आवश्‍यक असल्याचे वडिलांनी ओळखले व प्रवरानगर येथील डी. फार्मसाठी प्रवेश घेतला. व्यावसायिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचक्षेत्रात कार्यरत असलेले आणि बांधकाम क्षेत्रातही प्रसिद्ध असणारे ओतूर येथील एक आदर्श तरुण व्यक्तिमत्त्व संतोष देविदास तांबे यांच्याशी १५ मे २००२ मध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्वेता यांचा विवाह झाला.

एकत्र कुटुंबपद्धतीच्या संस्कारात वाढलेली श्वेता लग्नानंतर ओतूरमध्ये सासूसासरे देविदास रामजी तांबे व नंदा देविदास तांबे या कुटुंबीयांत लवकरच समरस झाली.

लग्नानंतर त्यांनी पती संतोष यांचे त्यांच्याच नावाने असलेल्या संतोष मेडिकल अँड जनरल स्टोअर्सची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. त्यामुळे संतोष यांनी आपल्या बांधकाम व्यवसायात मोठी गरुडझेप घेतली.

याच कालखंडात संसाररूपी वेलीवर एखादे फूल उमलावे त्याप्रमाणे श्वेता व संतोष यांच्या संसारात सईच्या रूपाने आनंद बहरला. त्यानंतर श्वेता यांनी आपली शिक्षण घेण्याची ओढ कायम ठेवून संतोष मेडिकलची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात बीएचे शिक्षण पूर्ण केले; तर पुढे नारायणगाव येथील रा. प. सबनीस महाविद्यालयात इंग्लिश विषय घेऊन एमए पूर्ण केले. मात्र त्यावरही न थांबता श्वेता यांनी शिक्षणमहर्षी विलासराव तांबे अध्यापक महाविद्यालयात शिक्षणशास्त्राची बीएडची पदवी संपादन केली.

शिक्षण घेत असताना त्यांनी व्यवसायावरही पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच पुढे संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स नावाने नवीन दुसरे मेडिकल सुरू करून व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली; तसेच संतोष यांनी आपल्या बांधकाम व्यवसायात सई डेव्हलपर्स नावाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असून सईच्या नावाने सई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सुरू केली आहे. सई पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला व सर्व सामान्य नागरिकांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी एक अनोखे पाऊलच संतोष यांनी टाकले आहे; तर गेली अठरा वर्षे संतोष तांबे हे ओतूर शहर भाजपचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसेच नुकतीच ८ फेब्रुवारी २०१९ रोजी संतोष तांबे यांची ओतूरच्या सरपंचपदी निवड झाली. अनंत अडचणींवर मात करून यशस्वी उद्योजक ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचालीचा सरपंच पदाच्या माध्यमातून शुभारंभ झाला आहे, असेच म्हणावे लागेल. तसेच श्वेता यांनी सखी महिला बचत गट स्थापन करून महिलांना एकत्र आणण्याचे काम केले. त्या सध्या सखी महिला बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com