
गेल्या चार वर्षापासून पीएमपीच्या बसमधून आणि बसथांब्यावर उभे असलेल्या प्रवाशांचे पैसे आणि दागिने चोरल्याचे त्यांनी कबूल केले.
मुंढवा : पुणे महानगर परिवहन(पीएमपी)च्या बसमधून गर्दीचा फायदा घेत, बसथांब्यावर खिसे कापणाऱ्या आणि प्रवाशांचे पैसे तसेच दागिने चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला, मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ११ गुन्हे उघड केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंचन चव्हाण या ताडीगुत्या चौकातून केशवनगरला बसने निघाल्या होत्या. त्यांच्या पर्समधून अनोळखी तीन इसम आणि एक महिला यांनी पर्समधील पाकीट चोरून नेले, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली.
- सीरमच्या आगीचा पंचनामा दुसऱ्या दिवशीही सुरुच; अहवालाबाबत अपडेट आले समोर
मुंढवा पोलिस या गुन्ह्यांचा तपास करीत असतांना पोलिस कर्मचारी निलेश पालवे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली, की महिला व ते इसम केशवनगर येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना वर्णनानुसार खात्री करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अकरा गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. त्याच्याकडून दागिन्यांसह २१ हजार तीनशे चाळीस रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
- 'तडीपार करेन नाही तर, मोक्का लावेन'; अजित पवार गरजले
त्यांचेकडे चौकशी केली असता शितल श्रीनिवास बाडेकर वय २८ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा, अविनाश सिद्राम जाधव वय २७ वर्षे व सचिन दगडू जाधव वय ३८ वर्षे दोघेही रा. पवार वस्ती केशवनगर, सचिन सिद्राम गायकवाड वय ३७ वर्षे रा. आनंदनगर मुंढवा, अशी नावे सांगितली. गेल्या चार वर्षापासून पीएमपीच्या बसमधून आणि बसथांब्यावर उभे असलेल्या प्रवाशांचे पैसे आणि दागिने चोरल्याचे त्यांनी कबूल केले.
- पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे
शहरात विविध ठिकाणी बसमधून चोरी केलेले २ लाख ७० हजार रूपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संपत भोसले आणि पोलिस निरिक्षक विजयकुमार शिंदे यांनी सांगितले. ही कारवाई प्रमुखांच्या मार्गदर्शनाने अविनाश मराठे, नाना भांदुर्गे, दिनेश रोणे, दत्ता विभूते, महेश पाठक, स्वप्नाली आंबले, निलेश पालवे या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास सहा. पोलिस निरिक्षक विजय चंदन करीत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)