Pune Rain : पाऊस ओसरणार; 'महा' चक्रीवादळाची तीव्रता झाली कमी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती.

पुणे : अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे पाऊस ओसरला आहे. परंतु आग्नेय बंगालच्या उपसागरात 'बुलबुल' चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.8) कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात बुधवारी आणि गुरुवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. परंतु काही ठिकाणीच हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. पुण्यासह उर्वरित काही जिल्ह्यांत सध्या पहाटे धुके, दुपारी उन्हाचा चटका, सायंकाळी ढगाळ हवामान आणि रात्री हवेत गारवा वाढला आहे.

- देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे राज्यातील पाऊस ओसरत असून, हवामान कोरडे राहणार आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक किमान तापमान नगर शहरात 16.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 

- विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ

पुण्यात उद्या आकाश ढगाळ राहणार

पुणे शहर आणि परिसरात गुरूवारी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शुक्रवारीही (ता.8) शहरात अशाच स्वरुपाचे तापमान राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. तर, काही ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

- पुणे : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात याचिका दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intensity of the Maha cyclone has decreased