पुणे : मिलिंद एकबोटेसह चौघांना अंतरिम अटकपूर्व जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bail
पुणे : मिलिंद एकबोटेसह चौघांना अंतरिम अटकपूर्व जामीन

पुणे : मिलिंद एकबोटेसह चौघांना अंतरिम अटकपूर्व जामीन

पुणे : भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषण (Provocative speech)केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन (Interim bail)मंजूर केला. सत्र न्यायाधीश पी. आर.अष्टुरकर यांनी हा आदेश दिला.

हेही वाचा: ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

या प्रकरणात कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj)याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत किंवा या आदेशापासून पुढील ६० दिवस दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत किंवा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, तपास यंत्रणांना सहकार्य करावे, पुराव्यात छेडछाड करू नये, या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर शिवप्रताप दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजर राहून आरोपांनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावनांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हावभाव करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी सहाजणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकबोटे (Milind Ekbote) बंधू, नागपुरे व शेटे यांनी अॅड. एस. के. जैन व अॅड. अमोल डांगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.(Pune News)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top