शाश्वत पाणी व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

जलव्यवस्थापन यांच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, यासाठी या परिषद पाचशेहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचा समारोप 7 नोव्हेंबरला जलशक्ति मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

पुणे : केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि जलसंपदा विभागाच्यावतीने शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सहा ते आठ नोव्हेंबरदरम्यान येथील हॉटेल हयात रिजेन्सीमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते परिषदेचे सकाळी उद्घाटन होईल, अशी माहिती जलसंपदा लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जनशक्ती मंत्रालयाचे राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सह आयुक्त राकेश कश्यप, दीपक कुमार, महासंचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता व्ही. जी. राजपुत, राजेंद्र मोहिते, एस.डी. भगत, अधीक्षक अभियंता एस.डी. चोपडे, प्रवीण कोल्हे उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेत जागतिक बँक, सिंचन व निचरा विषयक कमिशनचे तज्ञ तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमधील आंतरराष्ट्रीय जल तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेत 12 तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, जलसंधारण आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. परिषदेत संशोधकांसाठी एक पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विक्रेते आणि सल्लागारांकडून त्यांच्या उपकरणांच्या तंत्रज्ञान आणि क्षमता याबाबत सादरीकरण होणार आहे.

जलव्यवस्थापन यांच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, यासाठी या परिषद पाचशेहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचा समारोप 7 नोव्हेंबरला जलशक्ति मंत्रालयाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Conference on Sustainable Water Management in Pune