मंचरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलकेंद्र 

डी के वळसे पाटील
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

जगातील सर्व नामवंत ब्रँन्ड कंपन्यांच्या सायकली येथे एका छताखाली उपलब्ध आहेत. पुणे मुंबईचे ग्राहक येथे सायकल खरेदीसाठी येतील, असा विश्वास खासदार श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

मंचर : "कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल विक्रीचे अध्यावत वातानुकुलीत शोरूम पाहून थक्क झालो. जगातील सर्व नामवंत ब्रँन्ड कंपन्यांच्या सायकली येथे एका छताखाली उपलब्ध आहेत. पुणे मुंबईचे ग्राहक येथे सायकल खरेदीसाठी येतील" असा विश्वास खासदार श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला. 
  
मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रेक अँन्ड ट्रेल पृथ्वी एंटरप्रायजेस या अंतरराष्ट्रीय सायकल शोरूमचे उद्घाटन भोसले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड होते. यावेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक रमेश हांडे, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, अॅन्ड सुनील बांगर, दादाभाऊ पोखरकर, माथाजी पोखरकर, ट्रेक अ‌ॅन्ड ट्रेल पृथ्वी एंटरप्रायजेसचे संचालक शरद पोखरकर, सुषमा शिंदे, सतीश बेंडे उपस्थित होते. 

भोसले म्हणाले, "मला पसंत पडलेल्या सायकलची किमंत २ लाख ६० हजार रुपये आहे. ही सायकल मी नवी दिल्लीत वापरणार आहे. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी उधारी टाळा." 

गायकवाड म्हणाले, "धावपळ व दगदगीच्या वातावरणात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पूर्वी प्रमाणे सायकलचा वापर वाढला पाहिजे, अंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल विक्री केंद्र सुरु केल्यामुळे मंचरच्या नावाची कीर्ती सात समुद्रापार गेली आहे. बहुजन समाजासाठी शरद पोखरकर यांचे सामाजिक कार्य वाखाण्याजोगे आहे." आभर गीतांजली शरद पोखरकर यांनी मानले. 

 

Web Title: International level cycle centre at Manchar pune