आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यात घट

International-Vehicle-License
International-Vehicle-License

पुणे - परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज भासते. ही प्रक्रिया दीड वर्षापूर्वी ऑनलाइन केली. तरीही परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्यावर्षी २ हजार ९५५ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला होता; मात्र यंदा हे प्रमाण १ हजार ७७६ इतके खाली आले आहे. 

नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी असून अशा नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या ठिकाणी ती व्यक्ती राहायला आहे, तेथील आरटीओकडून संबंधित व्यक्तीला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. २०१८ पूर्वी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करून (मॅन्युअल) ही प्रक्रिया होत असे. त्यामुळे त्याला विलंब होत होता. म्हणून २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन केली. त्यानुसार संबंधित अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून ‘सारथी’ अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. यानंतर कागदपत्रांची तपासणी करून आरटीओतून त्याला एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत यंदा वाहन परवाना घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com