भिगवणला आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके व व्याख्यान

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 21 जून 2018

येथील क्षीरसागर विदयालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

भिगवण - येथील विविध शाळा व महाविदयालये व संस्थाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने योगाची प्रात्यक्षिके व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. योग व प्राणायाम करण्यासाठी निघालेले विद्यार्थी असे चित्र सर्वत्र सकाळी पहावयास मिळाले.

येथील क्षीरसागर विदयालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. योग शिबीराचे उद्घाटन भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षिरसागर यांचे हस्ते करण्यात आले. प्राचार्य तुषार क्षिरसागर, अविनाश गायकवाड व शिक्षक उपस्थित होते. एस. एस. दळवी यांनी योगा व प्राणायामची प्रात्यक्षिके घेतली. येथील विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कुलमध्येही योग दिनानिमित्त कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापुराव थोरात, सचिव विजय थोरात, वंदना थोरात व प्राचार्य मंगल आगवण उपस्थित होते. पतंजली योग समितीचे योगशिक्षक गिरीष मुनोत यांनी विदयार्थ्यांकडुन योगाची प्रात्याक्षिके करुन घेतली. गिरीष मुनोत म्हणाले, योगा व प्राणायाम सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपयुक्त आहेत. योग शारीरीक व मानसिक अरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे. 

येथील भैरवनाथ विदयालयामध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ए. व्ही. खारतोडे व टी. डी. लकडे यांनी योगाचे धडे दिले. यावेळी भैरवनाथ विदयालयाचे प्राचार्य अशोक बंदीष्टी, पयर्वेक्षक डी. एन. पांढरे व शिक्षक उपस्थित होते. येथील कला महाविदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन आले होते. यावेळी योगशिक्षक व महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गटकुळ यांनी योगा व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर केली. कायर्क्रमाचे नियोजन कायर्क्रम अधिकारी प्रा. सुरेंद्र शिरसट व विदयार्थी कल्याण अधिकारी प्रा. शाम सातर्ले व क्रिडा संचालक प्रा. पद्ममाकर गाडेकर यांनी केले.  

खानोटा (ता. दौंड) येथील कै. बी.व्ही. राजेभोसले विदयालयामध्येही योग दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक संजय मोरे, शिक्षक राजकुमार वाघ, विजयसिंह राजेभोसले, अंजली चवरे व शिक्षकवृंद उपस्थित होते. श्री. वाघमोडे यांनी विदयार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके घेतली. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्येही  शिक्षक रोहिदास पोंदकुले व मनिषा बंड यांनी चिमुकल्यांना योगाचे धडे दिले. मुख्याध्यापिका अंजना हेळकर व शिक्षक उपस्थित होते.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: International yoga day at bhigwan