जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची मुलाखत

जनार्दन दांडगे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

लोणी काळभोर - माथाडी माफिया, लॅन्ड माफिया, सॅऩ्ड माफिया, खाजगी सावकारांच्या बरोबर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी तडीपारी व मोक्का सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागरीक व पोलिस कर्मचारी यांच्याबरोबर थेट संपर्क साधुन, जिल्ह्यातील उद्योगधंद्यांसह सर्वसामान्य नागरीकांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे असे मत जिल्हा (ग्रामिन) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सकाळ, शी बोलतांना व्यक्त केले. 

लोणी काळभोर - माथाडी माफिया, लॅन्ड माफिया, सॅऩ्ड माफिया, खाजगी सावकारांच्या बरोबर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी तडीपारी व मोक्का सारख्या कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागरीक व पोलिस कर्मचारी यांच्याबरोबर थेट संपर्क साधुन, जिल्ह्यातील उद्योगधंद्यांसह सर्वसामान्य नागरीकांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे असे मत जिल्हा (ग्रामिन) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सकाळ, शी बोलतांना व्यक्त केले. 

सातारा जिल्हातील गुन्हेगारी व भाईगिरी मोडुन काढण्यासाठी मोक्का या कायद्याचा प्रभावी वापर केला होता. पुणे जिल्हातील माफियागिरी मोडुन काढण्यासाठी वेळ पडली तर शंभरहुन अधिक टोळ्यांच्यावर मोक्का लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही असेही संदीप पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ठ केले. 

जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेज हक यांच्याकडुन नुकताच, संदीप पाटील यांनी अधिक्षक पदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारुन कांही तासाचा कालावधी उलटत असतानाच, सकल मराठा मोर्चाने चाकन परीसरात पुकारलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले. यात शंभरहुन अघिक वाहने जळाली तर या परीसरातील उद्योगधंद्याचे कित्येक कोटींचे नुकसान झाले. एखाद्या मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांचे स्वागत जाळपोळीने झाल्याचे उदाहरण राज्याच्या इतिहासात क्वचितच आढळेल. चाकणची परीस्थिती हाताळत असताना, सकल मराठा मोर्चाकडुन 9 ऑगष्ठ रोजी संबध महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. 30 जुलैच्या पार्श्वभुमिवर नऊ ऑगष्ठचा बंद शांततेत पार पडावा यासाठी संदीप पाटील यांनी संपुर्ण जिल्हातील आजी-माजी आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, पोलिस पाटील, पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्याबरोबर थेठ संवाद साधुन नऊ ऑगष्ठचा शांततेत पार पाडला. या पार्श्वभुमिवर संदीप पाटील यांची भेट घेतली असता, पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी संदीप पाटील यांच्याबरोबर झालेली प्रश्नोत्तरे पुढील प्रमाने.. 

जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणुन सुत्रे स्विकारल्यानंतर कोणत्या कामाला जास्त प्राधाण्य देणार?
संदीप पाटील- सातारा जिल्हा हा पुणे जिल्ह्या लगत असल्याने, सातारा जिल्हात काम करताना जिल्हातील अनेक प्रश्नाची माहिती अगोदरच मिळालेली आहे. सातारा जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हात औद्योगिक वसाहती व महामार्गाची संख्या अधिक आहे. यामुळे साहजिक गुन्हेगारीचे प्रमाणही अधिक आहे. अधिक्षक म्हणुन सुत्रे स्विकारल्यानंतर जिल्हाची सखोल माहिती घेतली असता, ओद्योदिक वसाहतीमध्ये माथाडीवरुन गुन्हेगारी अधिक वाढल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे इतर जिल्ह्याच्या तुलेनेत पुणे जमिनीचे दर अधिक असल्याने, लॅन्ड माफिया व खाजगी सावकार मोठ्या प्रमानात सक्रीय असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील माथाडी कामगार संघटना, त्यांचे म्होरके, बेकायदा वाळु माफिया, लॅन्ड माफिया व खाजगी सावकारांची व लोकल दादा व त्यांच्या सध्याच्या हालचाली यांची अपटुडेट माहिती अधिक्षक कार्यालयाला तात्काळ देण्याच्या सुचना दिल्या आहेत. सातारा जिल्हातील गुन्हेगारी मोडुन काढण्यासाठी मोक्का व तडीपारीचा उपयोग प्रभावी केला होता. तसाच प्रयोज पुणे जिल्हातही करण्यात येणार आहे. गुन्हेगारी पुर्णपणे मोडुन काढण्यासाठी शंभरहुन अधिक मोक्का लावावे लागले तरी मागेपुढे पहाणार नाही असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. 

नागरीक, पोलिस अधिकारी व कर्मचारी याच्याशी संवाद वाढवण्यासाठी नेमके काय करणार?
संदीप पाटील- जिल्हात घडणारी प्रत्येक घटना अथवा बेकायदा कृत्य पोलिसांना समजावे यासाठी प्रत्येक पोलिस पोठीत ठाण्यात गोपनीय काम करणारे पोलिस कर्मचारी असतात. गोपनीय काम करणारे कर्मचारी आपआपल्या हद्दीत भविष्यात घडु पहाणाऱ्या व घडलेल्या प्रयेक गोष्टीची माहिती पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेला कळवत असतात. मात्र चाकण मधील घटनेचा आढवा घेतल्यास, स्थानिक पोलिसांच्या गोपनीय शाखेने जिल्हा पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेला कांहीही आगावु माहिती न दिल्याने चाकणची घटना रोखता आली नाही. यातुन धडा घेत, यापुढील काळात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडणारी घटना व संभाव्य धोके कळावेत म्हणुन पोलिस ठाण्यानिहाय वेगळी गुप्तचर यंत्रना राबविणार आहे. या गु्तचर यंत्रनेत काम करणारे पोलिस कर्मचारी थेट अधिक्षक यांच्यांशी संवाद साधु शकणार आहेत. या यंत्रनेत काम करणाऱ्यांचा व पोलिस ठाण्यात काम करणार्यांचा एकमेकाशी कांहीही संबध राहणार नाही याची काळजी अधिक्षक कार्यालयाकडुन घेतली जाणार आहे. या यंत्रनेत काम करणार्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणार्या प्रत्येक महत्वाच्या हालचालींची व घडलेल्या गुन्हांची माहिती अधिक्षक या नात्याने थेट आपल्याला देणे बंधन कारक असणार आहे. यात यंत्रनेत काम करणाऱ्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेोश असणार आहे. 

बेकायदा अवैध धंदे कसे रोखणार
संदीप पाटील- जिल्हातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक येत्या कांही दिवसात बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे व बेकायदा प्रवाशी वहातुक बंद करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे अवैध धंदे व बेकायदा प्रवाशी वहातुक, गुठका विक्री सारख्या सर्व प्रकारच्या बेकायदा कारवायांच्यावर कारवाई करण्यासाठी अधिक्षक कार्यालयीन पातळीवर विशेष पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. अधिक्षक कार्यालयाने नेमलेल्या गुप्तचर यंत्रनेकडुन अथवा एखाद्या खाजगी व्यक्तीकडुन अवैध धंद्याची माहिती मिळाल्यास, संबधित धंद्यावर अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाकडुन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबधित बेकायदा धंदा ज्या पोलिस बिट अधिकाऱ्याच्या कक्षेत असेल, त्या संबधित अधिकाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा दारु विक्री, गुटखा विक्री अथवा गावठी दारु उत्पादन करणारे, तसेच त्यांना संरक्षण देणारे पोलिस कर्मचारी असो वा अधिकारी एसो, बेकायदा कृत्यांना संरक्षण देणार्या सर्वांच्यावर कडक कारवाई कायदेशिर करणार आहे. यात कोणालाही सुट दिली जाणार नाही हे नक्की. 

नगर व सोलापुर महामार्गावरील वहातुक कोंडी फोडणार
वहातुक कोंडीच्या ठिकाणी इच्छा असुनही पुरेशे मनुष्य बळ देता नसल्याने वहान चालकांना वहातुक कोंडीला सामोरी जावे लागत आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी पोलिस व गृहरक्षक (होमगार्ड) दलाची सांगड घालण्यात येणार आहे. सध्या आठशे होमगार्ड उवलब्द असुन, येत्या कांही काळात आनखी सातशे होमगाडर्डची भरती करण्यात येणार आहे. तर मोठे उद्योगपती व औद्योदिक वसाहतीमधील कंपन्याना संपर्क साधुन, त्यांच्याकडुनही मनुष्बळ उपलब्द करुन घेणार आहोत. यामुळे वहातुक कोंडीच्या ठिकाणावर एक पोलिस व पाच वार्डन नेणण्यात येणार आहेत. नगर, नाशिकसह सर्वच महामार्गावरील वहातुक कोंडी सोडविण्यासाठी कठोर उपाय योजनाही राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

अपुरे पोलिस बळाचे काय
संदीप पाटील- पुणे जिल्हातील पोलिस बळाचा विचार केल्यास, नागरीक, कामाचा ताण लक्षात घेता पोलिस दलाकडे दिड हजार कर्मचारी कमी आहेत. यातुन मार्ग काढण्यासाठी सरकारकडे अधिक पोलिस बळाची मागणी करण्यात येणार आहे. पोलिस दलातील एकुण पोलिस कर्मचाऱ्याच्या तीस टक्के महिला पोलिस कर्मचारी आहेत. तीस टक्के महिला कर्मचारी असतानाही, सध्या त्यांच्याकडे फारशी महात्वाची कामे सोपवली जात नाहीत. मात्र यापुढील काळात महिला पोलिसांनाही गुन्हाचा तपास, विशेश शाखेत सहभाग, तसेच बेदोबस्तांची कामे सोपवली जाणार आहेत. तर दुसरीकडे होमगार्डचा वापर जास्तीत जास्त करुन, पोलिसांच्यावरील कामाचा ताण कमी कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

Web Title: Interview with District Police Superintendent Sandeep Patil