पुण्यात काँग्रेस इच्छुकांच्या उद्या मुलाखती

Congress_Logo
Congress_Logo

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या उद्या (मंगळवारी)  30 जुलैला काँग्रेस भवन येथे मुलाखती होणार आहेत.

पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सकाळी अकरा ते बारा या वेळेत पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मुलाखती होणार आहेत. त्यानंतर पुणे कँन्टोंमेंट, शिवाजीनगर, पर्वती, वडगाव शेरी,  कोथरूड, हडपसर आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील, अशी माहिती पुणे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अजित दरेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com