अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गडबडीत प्राध्यापकांच्या मुलाखती स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

विद्यापीठ व महाविद्यालयांमधील प्राध्यापक अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गडबडीत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत मुलाखतींचे वेळापत्रक निश्‍चित केले होते. मात्र, त्यास विरोध झाल्याने हा कार्यक्रम अखेर स्थगित केला आहे.

पुणे - विद्यापीठ व महाविद्यालयांमधील प्राध्यापक अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गडबडीत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत मुलाखतींचे वेळापत्रक निश्‍चित केले होते. मात्र, त्यास विरोध झाल्याने हा कार्यक्रम अखेर स्थगित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्‍टोबर महिन्यात पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहे, सध्या परीक्षांसाठी प्रश्‍नसंच करण्याचे काम प्राध्यापकांना देण्यात आले आहे. जवळपास 50 हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार असल्याने त्याचेही नियोजन करावे लागणार आहे. त्यातच विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत "कॅस' अंतर्गत प्राध्यापकांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यास अधिसभा सदस्यांनी विरोध करत या मुलाखती परीक्षेनंतर घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार 

यासंदर्भात विद्यापीठाने सोमवारी (ता. 21 ) परिपत्रक प्रसिद्ध करून मुलाखती स्थगित केल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेता मुलाखतीसाठी विषय तज्ज्ञांनी उपस्थित राहण्यास नकार दिल्याने मुलाखती स्थगित केल्या आहेत. नवे वेळापत्रक कालांतराने जाहीर केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews of professors postponed in the wake of final year exams