म्हाळुंगे नगररचना योजनेत सहाशे कोटींची गुंतवणूक करू  - किरण गित्ते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे -  म्हाळुंगे येथे उभारण्यात येणाऱ्या नगररचना योजनेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढील सात-आठ महिन्यांत जमीनमालकांना प्रॉपर्टी कार्डचे दाखले दिले जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. 

पीएमआरडीएकडून म्हाळुंगे-माण टीपीस्कीममध्ये केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामाची माहिती देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, सहायक संचालक धनंजय खोत उपस्थित होते. 

आयुक्त गित्ते म्हणाले, ""म्हाळुंगे हायटेक सिटीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमआरडीए सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या भागात 12 मीटर ते 36 मीटर रुंदीचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा आदी नागरी सुविधांचा समावेश यामध्ये असणार आहे. या टीपीस्कीममधील भूधारकांना चार एफएसआय मिळणार आहे.'' 

म्हाळुंगे टीपीस्कीममधील जमीनधारकांना आपल्या भूखंडाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी पीएमआरडीएमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे आठवड्यातून दोन दिवस कायदेशीर सल्ला, वास्तुविशारद सल्ला नागरिकांना मिळणार आहे ;तसेच बॅंक अधिकारी मार्गदर्शन करणार आहे. 

Web Title: Invest Rs 600 crores in Mhaluge Nagar Panchayat scheme - Kiran Gite