बना स्वतःच्या कुटुंबाचे फंड मॅनेजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच ‘फायनान्शियल प्लॅनिंग’ असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता, आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक आदी बाबींच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही स्वतःच स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक सल्लागार बनू शकता.

पुणे - आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच ‘फायनान्शियल प्लॅनिंग’ असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता, आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक आदी बाबींच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही स्वतःच स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक सल्लागार बनू शकता.

माध्यम क्षेत्रात विश्वासार्हतेने आणि सचोटीने काम करणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’ने यासाठी ‘सकाळ मनी’द्वारे पुढाकार घेतला आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार सकाळ मनी नैतिकतेच्या प्रेरणेतून मूल्यांच्या जपणूकीवर आधारित काम करीत आहे. २८ व २९ सप्टेंबर आणि ५ ऑक्‍टोबर हे तीन दिवस याबाबतचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण एपीजी लर्निंग, सकाळनगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे येथे होणार आहे. 

आर्थिक नियोजन कसे करावे, कर्ज विरुद्ध इक्विटी, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ कॅल्क्‍युलेशन आदी बाबींचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणार आहे. या क्षेत्रातील करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. प्रतिव्यक्ती शुल्क ः ४,९९९ रुपये. 
संपर्क - ८६६९६८९०२०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment Family Fund manager Sakal Money