fruad
sakal
पुणे - गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून १४ कोटी ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘बोट ब्रो’ आणि ‘माईन क्रिप्टो’ सह विविध बनावट कंपन्या आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दुबईस्थित मुख्य सूत्रधारासह २३ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.