Baramati : खाजगी कामात सहभाग आढळल्यास महावितरणच्या कर्मचा-यांवर कारवाई होणार....

महावितरणच्या कर्मचा-यांनी या पुढील काळात खाजगी बेकायदेशीर कामात सहभाग घेतला तर त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
Baramati
Baramati sakal

बारामती : महावितरणच्या कर्मचा-यांनी या पुढील काळात खाजगी बेकायदेशीर कामात सहभाग घेतला तर त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती, सातारा, सोलापूर, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना या बाबत एका पत्राद्वारे इशारा दिला आहे.

या पत्रात पावडे यांनी नमूद केले आहे की, असे निदर्शनास आले आहे की, शाखा व उपविभागीय कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकारी कंपनीच्या नियमाविरुध्द खाजगी पध्दतीने नवीन वीजपुरवठा करवून देण्याचे काम, वीजवाहिनी स्थलांतरीत करण्याचे, त्यांच्या मंजूरी व अंदाजपत्रकांचे काम आपल्या स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी करतात.

Baramati
Loksabha Election 2024 : बारामतीत लोकसभा निवडणूकीचे वाहू लागले वारे...

कंपनीच्या सेवा नियम 86(3) अंतर्गत अ.क्र. (26) नुसार कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करणे किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यापार करणे किंवा व्यवसायात गुंतलेले असणे किंवा कंपनीच्या सेवेत असताना कोणत्याही प्रकारे भागीदारीत भाग घेणे हे नियमबाहय असून हा दंडनीय गुन्हा सुध्दा आहे. तसेच यामुळे कंपनीच्या कार्यालयीन वेळेचा अपव्यय व दुरुपयोग होतो आहे.

त्यामुळे अशाप्रकारे नवीन वीजपुरवठ्याचे काम, वीज वाहिनी स्थलांतरीत करण्याची, मंजूरी व अंदाजपत्रकांचे काम इत्यादी प्रकारचे कुठलेही काम हातात घेणे किंवा अशाप्रकारच्या कामात भागीदारी करणे हे नियमबाहय आहे. अशाप्रकारच्या घटना आढळून आल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व नियंत्रण अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे नियमबाहय काम करतांना आढळल्यास कसुरदार अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com