esakal | IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांची लोणावळ्यात 'INS Shivaji' ला भेट
sakal

बोलून बातमी शोधा

 IPS Probationers Visit INS Shivaji in Lonavala

विविध सागरी मोहिमांमध्ये भारतीय नौदलाचा सहभाग तसेच नौदलाची प्रमुख सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएनएस शिवाजीच्या विशिष्ट भूमिके विषयी जाणून घेणे या दौऱ्याचे मुख्य उद्देश होते. 

IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांची लोणावळ्यात 'INS Shivaji' ला भेट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीतील 22 भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी लोणावळा येथील आयएनएस शिवाजीला नुकतीच भेट दिली. यामध्ये चार मित्र देशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. अभ्यास आणि सांस्कृतिक सहलीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. विविध सागरी मोहिमांमध्ये भारतीय नौदलाचा सहभाग तसेच नौदलाची प्रमुख सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएनएस शिवाजीच्या विशिष्ट भूमिके विषयी जाणून घेणे या दौऱ्याचे मुख्य उद्देश होते. 

कोरोनामुळे अवघ्या 24 तासात जुळ्यांनी हरवले आईचं छत्र, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना
 यावेळी आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर रवनिश सेठ यांनी भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. तसेच संस्थेतील प्रशिक्षणाच्या कार्यपद्धती, अभियांत्रिकी संग्रहालय, एनबीसीडी स्कूल आणि ईपीसीटी स्कूल येथील कार्यप्रणालीबाबत माहिती दिली.

loading image