.

.
Published on: 

इराणच्या अणुप्रकल्पांवर ‘नजर’

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची माहिती; करारातील महत्त्वाचा मुद्दा

टोकियो, ता. २४ (पीटीआय) : इराणमधील अणुप्रकल्पांना आपल्या संस्थेचे निरीक्षक भेट देतील, असे संकेत संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेच्या प्रमुखांनी बुधवारी दिले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी करण्यात आलेल्या कराराचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (आयएईए) प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी याबाबत माहिती दिली आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमची स्थिती निश्चित करण्यासाठी या संस्थेची पाहणी महत्त्वाची मानली जाते.
सन २०२५ मध्ये इस्राईलने इराणवर पुकारलेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर, इराणने ‘आयएईए’ला आपल्या अणुप्रकल्पांना भेट देण्यापासून रोखले होते. या ठिकाणी इराणने किमान १० अण्वस्त्रे तयार करण्यासाठी पुरेसा युरेनियमचा साठा केल्याचा संशय आहे. आमचे अणुप्रकल्प शांततापूर्ण जीवनासाठीच असल्याचा दावा इराण सातत्याने करीत आला आहे. मात्र, अण्वस्त्र कार्यक्रम नसतानाही ६० टक्क्यांपर्यंत युरेनियम संवर्धन करणारा इराण हा जगातील एकमेव देश आहे. या प्रकल्पांच्या तपासणीबाबत अमेरिका आणि इराणने मंगळवारी परस्परविरोधी विधाने केली होती.
त्सुनामीग्रस्त फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पात आयोजित पत्रकार परिषदेत ग्रोसी म्हणाले, ‘‘मी राजकीय विधाने समजू शकतो, तो वास्तवतेचा भाग आहे. मात्र, दोन्ही देशांच्या अध्यक्षांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार अणुप्रकल्पांमध्ये होणाऱ्या सर्व हालचालींवर ‘आयएईए’ची देखरेख असेल.’’

इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

दुबई : ‘इराणमधील सद्यःस्थितीमध्ये सुधारणा झाली असली, तरी पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी इराणचा अनावश्यक प्रवास टाळावा,’ असा सल्ला भारताने बुधवारी दिला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील सद्यःस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सुधारित नियमावली प्रसिद्ध केली आहे. दूतावासाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘सुरक्षा परिस्थितीत सुधारणा झाली असली, तरी भारतीय नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत इराणचा अनावश्यक प्रवास टाळावा.’’ सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा अपरिहार्य कारणास्तव तिथे प्रवास करणाऱ्या भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि दक्ष राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली
Bhivbandar Nuclear Project
Dapoli Villagers Protest
Dapoli Nuclear Power Project JSW Energy to Invest 44000 Crore for 2800 MW Plant and Create 8000 to 10000 Jobs in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com