‘आयर्नमॅन’साठी परमार लावणार कौशल्य पणाला

पुण्यातील उद्योजक आणि तीन वर्षांपूर्वी १०० हून अधिक किलो असलेले आपले वजन आटोक्यात आणणारे हेमंत परमार हे जर्मनी येथे होणाऱ्या आयर्नमॅन हॅमबर्ग स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
Hemant Parmar
Hemant ParmarSakal

पुणे - पुण्यातील उद्योजक आणि तीन वर्षांपूर्वी १०० हून अधिक किलो असलेले आपले वजन आटोक्यात आणणारे हेमंत परमार (Hemant Parmar) हे जर्मनी येथे होणाऱ्या आयर्नमॅन हॅमबर्ग स्पर्धेत (Ironman Hamburg Competition) आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. (Ironman Hamburg Competition Hemant Parmar)

या वेळी बोलताना लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया म्हणाला जेव्हा तुम्ही आपल्या आवडीच्या एखाद्या क्षेत्रासाठी झोकून देता आणि आपल्या ध्याकडे टप्प्याटप्याने वाटचाल करता तेव्हा तुम्हाला काहीही अशक्य नसते. परमार यांनी टाकलेले प्रत्येक छोटे पाऊल सुद्धा त्यांच्या मोठ्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरले तसेच अत्यंत कडक अशी दैनंदिन जीवनशैली आणि अत्यंत आरोग्यपूर्ण आहार यामुळेच आज इथपर्यंत पोहोचले आहेत.

Hemant Parmar
पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय

लक्ष्य आणि सुहाना यांनी यापूर्वी अनेक खेळाडूंना सहकार्य केले आहे. यावेळी सुहानाचे संचालक व लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि रॅडस्ट्रॉंगचे व २५ वेळा आयर्नमॅन स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा डॉ. कौस्तुभ राडकरच्या वतीने हेमंत परमारला स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी परमार यांनी तीन वर्षांपूर्वी १०० पेक्षा जास्त वजन असल्यापासुन फिटनेसपर्यंतचा आपला प्रवास शेअर केला. फॅट टू फिट असा हा आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून तीसपेक्षा अधिक मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. गोव्यात झालेली हाल्फ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करता आले. ही स्पर्धा प्रथमच भारतात झाली. आता मी प्रथमच जर्मनीत होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होत भविष्यात अशा अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेणार आहे.

या वेळी कौस्तुभ राडकर म्हणाला परमार यांनी दाखविलेल्या प्रचंड प्रगतीमुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांचे अनेक मित्र आणि कुटुंबातील सदस्यही प्रभावित झाले असून आता आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारत आहेत.

सुहानाचे चेअरमन राजकुमार चोरडिया, लक्ष्यचे उपाध्यक्ष आशिष देसाई यांनी आपले मनोगत केले, तर सुहाना (टेक्निकल)चे संचालक आनंद चोरडिया यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com