शिवाजीराव भोसले बँकेच्या अधिकाऱ्यांसह चौघांची न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून पावणे सहा कोटी रूपयांचे कर्ज देताना त्यातील अनियमीतता सहकार विभागाच्या लेखापरिक्षणात समोर आली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँकेच्या तीन अधिकाऱ्यांसह चौघांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

हरबन्ससिंग शिंगारसिंग जब्बल (रा. निगडी प्राधिकरण), बँकेचे शाखाअधिकारी मिलिंद चिमणशेठ टण्णू, तत्कालिन कर्ज अधीक्षक वसंत धाकू भुवड, हनुमंत संभाजी केमधरे (रा. वाकड) या चौघांना अटक केली आहे. विशेष लेखापरिक्षक चांगदेव यशवंत पिंगळे (रा. कोरेगाव पार्क) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2013 ते ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत शिवाजीनगर येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शाखेने मे जब्बल अँटो प्रा. लि. या कंपनी आणि मे. यापिशिका इंजिनिअरिंग प्रा. लि. या दोन कंपन्यांना सहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या दोन्ही कंपन्याचे संचालक जब्बल आहेत. या कर्ज प्रकरणाचे सरकार विभागाने सुक्ष्म लेखापरिक्षण केले. त्यावेळी त्यामध्ये कर्ज मंजुरी करताना अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. यामुळे याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. 

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात जब्बल, टण्णू, भुवड आणि केमधरे यांना अटक केली होती. या चौघांचीही पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आज (बुधवारी) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

Web Title: Irregularities in debt cases; Judicial custody to Four including Shivajirao Bhosale Bank officials