खडकवासला धरणाचा भराव असुरक्षित; नियमित स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Irrigation department neglects regular cleaning safety of Khadakwasla dam
Irrigation department neglects regular cleaning safety of Khadakwasla dam

किरकटवाडी: नियमित स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने खडकवासला धरणाच्या भरावावर झुडपांसह अनेक लहान मोठी झाडे वाढलेली दिसत आहेत. काही मोठ्या झाडांची मुळे खोलवर गेलेली असल्याने मातीचा भराव असुरक्षित बनला आहे.खडकवासला धरणाच्या भरावाला अक्षरशः जंगलाचे स्वरुप आले आहे. पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान संपूर्ण भरावाचा परिसर झाडेझुडपे तोडून स्वच्छ केला जातो, परंतु सद्यस्थितीत भरावावर वाढलेल्या बाभुळ, कडुनिंब, बोर व इतर प्रकारच्या झाडांचा आकार पाहिल्यास किमान दोन वर्षांपेक्षा जास्त काळाची ही झाडे झालेली दिसत आहेत.त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पाटबंधारे विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुंपणही आहे तुटलेले....
खडकवासला धरणाच्या भरावा भोवताली असलेले तारेचे कुंपणही अनेक जागी तुटलेले आहे.काही उपद्रवी तरुण पर्यटक या तुटलेल्या कुंपणाच्या ठिकाणांमधून भरावावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतात.वाढलेल्या झुडपांमुळे कोण येतं व कोण जातं हे दिसून येत नाही.त्यातच धरणावर कर्मचारी संख्या अत्यंत कमी असल्याने अशा संवेदनशील बाबींवरही पाटबंधारे विभागाला नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

"खडकवासला धरणाच्या भरावाच्या साफसफाई बाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. पाटबंधारे विभागाने धरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून अशी कामे प्राधान्याने करून घेणे आवश्यक आहे."
- सौरभ मते, सरपंच खडकवासला.

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

"काही तांत्रिक अडचणींमुळे भरावाची साफसफाई राहीलेली असावी. लवकरच सर्व भरावावर वाढलेली झाडेझुडपे तोडून भराव स्वच्छ करण्यात येणार आहे." - राजेंद्र राऊत, खडकवासला धरण शाखा अभियंता

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com