Corona Virus : आयुधतर्फे विलगीकरण कक्षासाठी 285 बेड्सची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सध्याची परिस्थिती पाहता देशात या सर्वांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी देशातील विविध आयुध कारखाने पुढाकार घेत आहेत.

पुणे : देशात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावला रोखण्यासाठी आयुध निर्माण कारखान्याच्या वतीने (ऑर्डनेन्स फॅक्टरी बोर्ड - ओएफबी) लष्कराच्या विविध रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात 285 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयात लागणारे यंत्रणे आणि संसाधनांचा उत्पादनाचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नुकतीच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (ओएचबीडब्ल्यू) वतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार ओएफबीचा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला होता. यामध्ये ओएफबी रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करणे व संबंधित बेड्सची संख्या वाढविण्यात आली.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

​देशसेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या आयुध निर्माण कारखान्यांनी कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणांची व संसाधनांची निर्मितीवर भर दिले आहे. त्यामध्ये कोरोना विषाणू विरोधी पोषाख, मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर आदींचा समावेश आहे. तसेच बनावटी मास्क, हँड सॅनिटायझरच्या विक्रीला बंद करण्यासाठी व आरोग्य विभागाला मदत करण्यासाठी हा वाटा उचलण्यात आला आहे.

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय
सध्याची परिस्थिती पाहता देशात या सर्वांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यासाठी देशातील विविध आयुध कारखाने पुढाकार घेत आहेत.

लष्करी रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलेल्या या 285 पैकी 40 बेड जबलपूरमध्ये, खडकी, इशापूर, कोसीपूर, कानपूर, खमरिया व अंबाझरी येथे प्रत्येकी 30 बेड, चेन्नईजवळील आवडी व हेद्राबाद येथील मेढक येथे प्रत्येक 20 तर, 25 बेड अंबरनाथ येथे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for isolation cell 285 bed arrangement by the ordnance factory Corona Virus