'ग्रामीण भाग जोडण्याचे इस्रोचे ध्येय'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - केंद्र सरकार ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करत आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक पहिले भारतीय होते. त्यांच्या दूरदृष्टीनुसारच देशाला नेतृत्व, उद्योजकता, नवनिर्मिती व आर्थिक विकासाच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नांना चालना मिळाली. इस्त्रोनेदेखील अवकाश संशोधनात अनेक साध्ये साध्य केली असून, ग्रामीण भागाला देशाशी जोडणे, हेच इस्त्रोचे ध्येय आहे, असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्था(इस्त्रो) चे अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांनी केले. 

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. सिवन यांना याप्रसंगी ‘लोकमान्य टिळक सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले. महापौर मुक्ता टिळक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, गीताली मोने, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. डॉ. टिळक लिखित, ‘लीगल बॅटल ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ व  ‘ लोकमान्य टिळक आणि प्रसारमाध्यमे’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. चव्हाण म्हणाले, ‘‘केंद्र सरकार बुलेट ट्रेन आणू इच्छित आहे. त्यासाठी परदेशी कंपनीवर सरकारला भरवसा आहे. पण, भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यामध्येसुद्धा गुणवत्ता आहे. परंतु त्यांच्याबद्दल केंद्र सरकारला भरवसा का वाटत नाही.’’ शिंदे, विखे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: ISRO goal of connecting rural areas