

The achievement highlights the growing interest of rural students in space science and academic excellence in Maharashtra.
Sakal
माळेगाव : बारामती तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘डायमंड टॅलेंट सर्च’ परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे दोघांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे होणाऱ्या पाच दिवसांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली असून, शाळेसह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.