इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर...धनंजय मुंडेप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

पुणे  : ''धनंजय मुंडेंना करूना शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नयेत, मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर, विषय खूप व लांब जाईल. आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे.'' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. '' विरोधकांचे काम टीका करणे असले तरी पण ती कोणत्या पातळीपर्यंत करावी? यालाही मर्यादा आहेत.  कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हत, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण सांगायलाच हव्यात का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​ 
शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा : अजित पवार
शेतकरी आंदोलनासाठी जिल्हास्तरांवर कोरोनामुळे गर्दी नको. तालुकास्तरावर आंदोलनं करता आले असते. शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी आम्ही महाराष्ट्रात करतच नाही. केंद्र सरकार नवीन निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत काही करण्याची गरज नाही अशी भूमिका आहे. एकीकडे आम्हीच नियमवामली करायची आणि आम्हीच गर्दी करायची हे बरोबर नाही, तरीपण गर्दी झाली. मुंबईऐवजी चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलने झाली असती तर ते बरे झाले असते,पण आंदोलनाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the issue of Dhananjay Munde and Karuna Dharma Ajit Pawar slammed the opposition