
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना याबाबतची माहिती मिळाली होती. तसेच काही नागरीकांनीही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातील गर्दीच्या चौकांमधील सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी 13 तृतीयपंथीयांविरुद्ध कारवाई केली.
- पुण्यात टू-व्हिलरवरून जाणाऱ्या तरुणावर गोळीबार; कात्रज-कोंढवा रस्त्यावरची घटना
पुणे-सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता तसेच शहराच्या उपनगरांमधील महत्वाच्या चौकातील सिग्नलला वाहनचालक थांबल्यानंतर तृतीयपंथीय समूहाने येऊन वाहनचालकांकडे पैसे मागण्याचे प्रकार शहरात मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. बहुतांश तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांना धमकावून पैसे घेण्याच्याही घटना घडत होत्या. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांना याबाबतची माहिती मिळाली होती. तसेच काही नागरीकांनीही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.
- शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी संबंधीत तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौकात 3, हडपसर येथील लोणी टोलनाका येथे 3, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक 2 , सारसबागेजवळील चौकात 3, पौड रस्त्यावरील करिश्मा सोसायटी चौक 2 येथे चौकांमध्ये कारवाई केली. वाहनचालकांची वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी 13 तृतीयपंथीयांविरुद्ध महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)