विश्वास पाटील-श्रीपाल सबनीस यांच्यात तंटामुक्ती

sabnis patil
sabnis patil

पुणे : "विश्वास पाटील यांनी मला दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवलं आहे ते मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाचे पत्र आहे. आमच्यात जे काही मतभेद झाले आहेत ते आजच्या कार्यक्रमात संपले आहेत,आजपासून आमची मैत्री घट्ट होईल. ज्याच्याकडे दिल असते तोच दिलगिरी व्यक्त करू शकतो पाटील हे मोठया दिलाचे आहेत ,जी  माणसं संघर्षातून  एकत्र येतात ती निखळ दोस्ती करतात."असे सांगत जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी आज त्यांच्याबाजूने 'तंटामुक्ती' जाहीर केली. विश्वास पाटील यांनीही सबनीस यांच्या सुरात सूर मिसळला.

गेल्या काही दिवसापूर्वी पानिपत कार विश्वास पाटील आणि आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. अगदी जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप झाले होते. आज मात्र विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या 'नागकेशर 'या राजकीय  कादंबरीच्या प्रकाशनच्या निमित्ताने सबनीस आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी उपस्थित होते. 

'पाटील हे प्रतिभावंत लेखक आहेत,त्यांच्या प्रतिभेवर माझं प्रेम आहे.त्यांनी मोठया मनाने माझी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले. ते पत्र म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे.'

विश्वास पाटील म्हणाले,'सबनीस आणि माझ्यात काही मतभेद झाले होते, पण आज आमच्यातील मतभेद दूर झाले आहेत. गैरसमजातून मतभेद होतात तसेच आमचे झाले. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही एका शब्दमळ्याचे मालक आहात मी एका शब्दमळ्याचा, आपण दोघ साहित्यात कसदार पिकं घेऊया. मायमराठी समृद्ध करूया.' यावेळी लेखिका अश्विनी धोंगडे,डॉ राजेंद्र हिरेमठ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com