गृहमंत्र्यांच्या मतदार संघात IT ची कारवाई; मोठ्या दुग्धव्यवसायावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax

गृहमंत्र्यांच्या मतदार संघात IT ची कारवाई; मोठ्या दुग्धव्यवसायावर छापा

आंबेगाव: तालुक्यातील मंचरमध्ये आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. उद्योजक देवेंद्र शहा यांच्या उद्योग-व्यवसायांसह त्यांच्या घरावर IT ची छापेमारी सुरु आहे. देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समुहावर ही छापेमारी होत आहे. या छापेमारीमध्ये चार टिम्स सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त 'साम टीव्ही'ने दिलं आहे.

हेही वाचा: एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

पराग मिल्क, गोवर्धन उद्योग समुहाचे दुध उत्पादनात जगभरात जाळं आहे. आंबेगाव तालुक्यातील IT च्या या छापेमारीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने IT ची कारवाई सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे.

loading image
go to top