Video : "लॅंडस्केप रिऍलिटी'बाबत पीएनजीचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांचा मोठा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

लॅंडस्केप रिऍलिटी मध्ये आपली कोणतीही भागीदारी किंवा गुंतवणूक नाही. दिवाण हाउसिंग कॉर्पोरेशन लि.चे कर्ज बुडविल्याचा आरोप चुकीचा आणि धादांत खोटा आहे. या संदर्भात अफवा पसरविण्यात येत असून संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली असल्याची माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी आज दिली. 

पुणे : लॅंडस्केप रिऍलिटी मध्ये आपली कोणतीही भागीदारी किंवा गुंतवणूक नाही. दिवाण हाउसिंग कॉर्पोरेशन लि.चे कर्ज बुडविल्याचा आरोप चुकीचा आणि धादांत खोटा आहे. या संदर्भात अफवा पसरविण्यात येत असून संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली असल्याची माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी आज दिली. 

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

 

दिवाण हाउसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने वर्तमानपत्रात गुरुवारी (ता. 17) प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये सौरभ गाडगीळ व राधिका गाडगीळ यांचे नाव जामीनदार म्हणून छापण्यात आले होते. ही जाहिरात समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरविण्यात आली. तसेच पीएनजी ज्वेलर्स अडचणीत असल्याची अफवाही पसरविण्यात आली. यावर गाडगीळ त्यांनी खुलासा केला. 

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

सौरभ गाडगीळ म्हणाले, "" पीएनजी ज्वेलर्स लॅंडस्केप रिऍलिटी मध्ये गुंतवणूकदार किंवा भागीदारही नाही. या डिमांड नोटीसमध्ये सौरभ गाडगीळ आणि राधिका गाडगीळ यांचे नाव कर्जदार म्हणून नव्हे तर लॅंडस्केप रिऍलिटीचे जामीनदार म्हणून नमूद करण्यात आले आहे. पीएनजी ज्वेलर्सकडे बॅंकर्स, ऑडिटर्स, डायरेक्‍टर्स आणि व्यवस्थापनाची वेगळी टीम आहे. याचा "लॅंडस्केप रिऍलिटी'शी काहीही सबंध नाही. लॅंडस्केप रिऍलिटी ही रिअल इस्टेटमधील स्वतंत्र कंपनी आहे. आम्हाला बदनाम करण्याचा हा एक कट आहे. याबाबत आम्ही सायबर सेलकडे तक्रार देखील केली आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. पीएनजी ज्वेलर्स कायम ग्राहकांच्यासोबत आहे. आमची सर्व दालने सुरू आहेत. तुम्हाला काहीही शंका असेल तर आमच्या कोणत्याही शाखेशी संपर्क करा.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "It has nothing to do with landscape reality," said PNG president Saurabh Gadgil.