esakal | Daund : दौंड शुगर कारखान्यात प्राप्तीकर विभागाची शोध मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

daund sugar mill

Daund : दौंड शुगर कारखान्यात प्राप्तीकर विभागाची शोध मोहिम

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्राप्तीकर विभागाने शोध मोहिम सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या साखर कारखान्याचे मार्गदर्शक आहेत.

हेही वाचा: रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड

आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर लिमिटेड या खासगी कारखान्याच्या कार्यालयात ७ ऑक्टोबर रोजी सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्यांनी शोध मोहिम सुरू केली. प्राप्तीकर विभागाचे विविध पथक कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करीत आहेत. कारखान्याचे संचालक तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी त्यास दुजोरा दिला. ते म्हणाले , "कारखान्यात प्राप्तीकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांची शोध मोहिम सुरू आहे."

प्राप्तीकर विभाग नेमक्या कोणत्या कारणास्तव शोध मोहिम राबवित आहे याचा तपशील उपलब्ध झाला नाही. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित दौंड सहकारी साखर कारखान्याचे सन २००९ मध्ये दौंड शुगर लिमिटेड मध्ये रूपांतर झाले होते. देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

हेही वाचा: चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.3%; जागतिक बँकेचा अंदाज

अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रसामग्रीने कारखाना परिपूर्ण आहे. दररोज ६००० टन उसाचे गाळप करण्याची कारखान्याची क्षमता आहे. साखर निर्मितीसह १८ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प आणि प्रतिदिन ९०००० लिटर उत्पादन क्षमतेचा आसवनी प्रकल्प आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक ऊसदर, स्वच्छता, हिरवाई आणि साखर पूरक उद्योगांसाठी कारखाना ओळखला जातो.

loading image
go to top