आता तुमच्या वॉर्डात किती पाऊस पडला हेदेखील समजणार; कसे? वाचा सविस्तर!

Rain
Rain

पुणे : तीन बाय तीन किलोमीटर म्हणजे साधारणत: पुणे शहरातील पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्यांचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य होणार आहे. पूर्वी 81 चौरस किलोमीटर भागातील पावसाचे मोजमाप केले जात होते. त्याच्या 9 पटीने कमी क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे दर पंधरा मिनिटांनी मोजमाप घेणे शक्‍य होणार आहे.

परिणामी या मोजमापावरून धरणातील पाण्याची पातळी किती वाढणार आहे, याची अचूक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे, पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, संभाव्य पूरबाधित क्षेत्रात पूर्वसूचना देणे पाटबंधारे खात्याला शक्‍य होणार आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून (आयएमडी) दरवर्षी पावसाचा अंदाज दिला जातो. तसेच पावसाळ्यात देखील पावसाची नोंद घेतली जाते. परंतु आजपर्यंत 9 बाय 9 किलोमीटरच्या म्हणजे 81 चौरस किलोमीटर परिसरात पाडलेल्या पावसाची नोंद घेऊन त्या आधारे किती पाऊस झाला, याचे अनुमान लावले जात होते. परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे खात्याला अडचणी येत होत्या. परंतु पावसाचे अधिक अचूक मोजमाप करता यावे, यासाठी 'आयएमडी'ने सध्याच्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

9 बाय 9 ऐवजी 3 बाय 3 किलोमीटर परिसरात पडणाऱ्या पावसाचे अचूक मोजमाप करणारी सिस्टिम विकसित केली आहे. म्हणजे नऊ किलोमीटरच्या परिसरात पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचा हिशोब ठेवणे, शक्‍य होणार आहे. त्यावरून कोणत्या भागात किती मिलिमीटर पाऊस झाला आहे, त्यातून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किती पाणी येऊ शकते, यांचे अनुमान काढणे शक्‍य होणार आहे. याचबरोबरच हवेतील आर्दता, वाऱ्याचा वेग, दिशा यांचे मोजमापही करणे शक्‍य होणार आहे. 

आयएमडीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर पाटबंधारे खात्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी "रिअल टाइम डेटा ऑक्वि जिशन सिस्टिम' आणि 'रिअल टाइम डिझाईन सपोर्ट सिस्टिम' यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. परिणामी आयएमडीने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस यांचे अचूक मोजमाप करणे पाटबंधारे खात्याला शक्‍य होणार आहे. दर पंधरा मिनिटांना हे अपडेट मिळणार असल्यामुळे किती पाऊस पडत आहे अथवा पडला आहे, त्यातून किती पाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार आहे, यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्यावरून धरणातील पाण्याचे नियोजन करणे पाटबंधारे खात्याला शक्‍य होणार आहे. 

- सध्या 81 चौरस किलोमीटर परिसरात पडणाऱ्या पावसाची नोंद होते. 
- आता नऊ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद घेणे शक्‍य. 
- परिणामी पावसाचे अचूक आणि विश्‍वासर्ह अंदाज वर्तविणे शक्‍य होणार. 
- त्यातून किती मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे किती पाणी पाणलोट क्षेत्रात येणार हे कळण्यास मदत होणार. 
- पावसाळ्यात धरणातील पाण्याचे अधिक अजूक नियोजन करणे शक्‍य होणार 
- धरणातील पाणीसाठ्याचे वर्षभराचे सुयोग्य व्यवस्थापन करणे सोपे होणार

राष्ट्रीय जलविज्ञान मिशनतंर्गत अचूक आणि विश्‍वासर्ह पावसाचे अंदाज व इतर हवामानातील घटकांची माहिती देणारी "रियल टाइम डेटा ऍक्विजिशन' तसेच ऍनालिसेस करणारी यंत्रणा आयएमडीकडून विकासित करण्यात आली आहे. पाटबंधारे खात्याकडे सध्या उपलब्ध प्रणालीमध्ये आवश्‍यक ते बदल करून ही यंत्रणा येत्या वर्षभरात कार्यन्वीत करण्यात येणार आहे. 
- संजय हेगाण्णा, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे खाते 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com