जुन्नर - ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी अर्ज सादर करता आले नाहीत त्यांच्यासाठी शासनाने २० ऑगस्ट पर्यंत मुदत वाढविली आहे. इच्छुकांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन माणिकडोह येथील आयटीआय चे प्राचार्य डी.एस.जगताप यांनी केले आहे.