
पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) चौथ्या प्रवेश फेरीत १७ हजार ६७५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संस्था मिळाल्या आहेत. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ६) ते रविवार (ता. १०) पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.