आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

 आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. 

पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे.

मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI exam online