आयटीआयच्या विद्यार्थ्यांची भरारी

आशा साळवी
सोमवार, 21 मे 2018

पिंपरी - आयआयटी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी हमखास मिळते. मात्र, आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) व्यावसायिक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनाही नोकरीसाठी परदेशगमनाची संधी मिळू लागली आहे. गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील आयटीआयमध्ये शिकलेल्या ४१ विद्यार्थ्यांनी नोकरीनिमित्त परदेशात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, तसेच आखाती देशांत चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या ते करत आहेत. 

दहावीत कमी गुण मिळाल्यास पालक डोनेशन भरून पाल्याला एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. रोजगाराची संधी असलेल्या कौशल्य व व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ते दुर्लक्ष करतात. अनेकांना हा ‘ब्ल्यू कॉलर’ नोकरी कमीपणाची वाटते. तथापि, प्रत्यक्षात व्यावसायिक कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत मोठी संधी आहे, याकडे मोरवाडीतील आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी लक्ष वेधले.

ते म्हणाले, ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्‍ट्रिशियन आणि एसी मेकॅनिक्‍सची मोठी कमतरता जाणवते. या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना तेथे मोठी मागणी आहे. तेथील गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आणखी प्रशिक्षण देऊन पाठविले जाते. प्राधिकरणातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या आयटीआयमधील २१ विद्यार्थ्यांना ऑडॉर वेल्डिंग कंपनीने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती. आखाती आणि आफ्रिकी देशांत वेल्डर क्षेत्रातील कामगारांना मोठी मागणी असल्याचे आयटीआयचे प्राचार्य बसवराज विभूते यांनी सांगितले.

आमच्याकडील विद्यार्थ्यांना भोसरीतील केजीसी कंपनीमध्ये ‘स्कील डेव्हलपमेंट ट्रेनिंग’ दिले जाते. त्यांच्या मुलाखती, प्रॅक्‍टिकल परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी या पद्धतीने कॅम्पसमध्ये थेट भरती प्रक्रिया पार पडते आणि निवडलेले प्रशिक्षणार्थी ऑस्ट्रेलिया, दुबईकडे रवाना होतात.
- एस. आर. खडतरे, प्राचार्य, शासकीय आयटीआय, निगडी

आतापर्यंत परदेशात गेलेले विद्यार्थी 
 निगडी शासकीय आयटीआय    20
 मोरवाडी महापालिका आयटीआय    17
 कॅम्प एज्युकेशन सोसायटी आयटीआय    4

या ट्रेडला आहे मागणी
 रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनिंग
 इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक
 पेंटर जनरल
 वेल्डर
 ड्राफ्ट्‌समन

Web Title: ITI Student Success