‘आयटीयन्स’ना नोकरी जाण्याचा धसका

Itians
Itians

पिंपरी - माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका ‘बलाढ्य’ कंपनीने दहा टक्के कर्मचारी कपातीची घोषणा गेल्या आठवड्यात केली. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपनीने असा थेट निर्णय घेतल्याने ‘आयटीयन्स’नी टर्मिनेशन्सचा धसका घेतला आहे.

हिंजवडी आयटी क्षेत्रात शंभरहून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. देशपातळीवरील बऱ्याच कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. हिंजवडी आयटीमधील २५ हजारांवर कर्मचारी कामाला असलेल्या एका नामांिकत कंपनीचा यात समावेश आहे. जेएल (जॉब लेवल) सहापासून ते जेएल आठपर्यंत येथे उच्च पदस्थांसह कर्मचारी कार्यरत आहेत. आकर्षक पॅकेज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना असल्याने सर्वांत मोठा धोका हा त्यांनाच आहे.

वरिष्ठ पदासह इतर पदांनाही कंपनी हात घालणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर टांगती तलवार आहे. प्रचंड पगार असलेल्या कर्मचाऱ्यांत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, एक्‍झिक्‍युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट अशा पदांचाही समावेश आहे. यात काही मध्यम व निम्न श्रेणी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.   

‘कॉग्निझंट’ कंपनीने तेरा हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केली. तेव्हापासून आयटी क्षेत्रावर मंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यात आणखी एका ‘बलाढ्य’ कंपनीने १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचे सांगून मंदीचा बॉम्ब टाकला आहे. आयटी क्षेत्रातील मंदी त्यामुळे प्रकर्षाने समोर आली आहे. येत्या काही कालावधीत कंपनी कधीही कर्मचाऱ्यांना थेट घरी बसण्यास सांगू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

गलेलठ्ठ पगार धोकादायक 
कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देऊन कामावरून तत्काळ काढून टाकणे घातक आहे. हिंजवडी, तळवडेसह मगरपट्टा, खराडी, सेनापती बापट रस्ता असे मिळून पुणे कार्यक्षेत्रात आठ ते दहा आयटी पार्कमध्ये लाखो कर्मचारी आहेत. हिंजवडीमध्ये सिंटेल, टाटा, टेक महिंद्रा, क्रेव्ह, व्हीसिनर्जी अशा नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. जिथे पगारवाढ चांगली मिळेल तिथे आयटीयन्स कंपन्या बदलून काम करीत आहेत. एकदा हातातील चांगली नोकरी गमावल्यानंतर दुसरीकडे काम मिळणे येथून पुढील कालावधीत कठीण आहे. शिवाय वयोगटही आता कारणीभूत ठरतो, असे गाऱ्हाणे आयटीयन्सचे आहे.

दहा टक्के कर्मचारी कपातीची एका बलाढ्य कंपनीकडून घोषणा
वरिष्ठ पदांसह गलेलठ्ठ पगाराच्या अधिकाऱ्यांना पाठविणार घरी
राज्य सरकारकडून समिती स्थापन करणे आवश्‍यक
आयटीयन्सला हवे कामगार कपातीचे स्वतंत्र धोरण
नोटीस पीरियडलाही कंपन्यांकडून केराची टोपली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com