Itians : आयटीयन्सवर बदल्यांचे संकट; पगारवाढीच्या महिन्यातच धक्का

पगारवाढीच्या महिन्यातच आयटीयन्सना एका नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.
Itians
ItiansSakal

पुणे - पगारवाढीच्या महिन्यातच आयटीयन्सना एका नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पुणे, मुंबईसारख्या बड्या शहरात असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. कंपनीची वाढ करण्याचे नियोजन आहे, अशी कारणे देत कर्मचाऱ्यांची दुसऱ्या शहरात बदली करण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील एका बड्या कंपनीत कार्यरत काही आयटीयन्सनी याबाबत कामगार विभागाकडे तक्रार केली आहे. विविध कारणे देत आयटीयन्सची अचानक बदली केल्याचा मेल केला जात आहे. ही बदली कर्मचाऱ्यांशी चर्चा न करता तसेच बदलीबाबत पूर्वकल्पना न देताच केली जात आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

....अन्यथा राजीनामा द्या !

बदलीच्या सूचनेचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कंपनी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कळविले आहे. तसेच सक्तीच्या बदल्यांना विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जात आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बदल्या स्वीकारण्यास किंवा नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे.

कुटुंबीयांनाही फटका

गेल्या काही महिन्यांपासून अनेक आयटी कंपन्यांनी ‘वर्क फॉर्म ऑफिस’ सुरू केले आहे. त्यामुळे कोरोना आणि त्यानंतर जवळपास डिसेंबर २०२३ पर्यंत घरून काम करीत असलेले आयटीयन्स पुन्हा कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यांचा येथील दिनक्रम निश्‍चित झाल्याने त्यानुसार त्यांनी नियोजन केले आहे. मात्र त्यातील अनेकांना पुन्हा आपले बस्तान बांधावे लागत आहे. त्यामुळे अचानक बदली झालेला आयटीयन्स आणि त्यांच्या कुटुंबाचे नियोजन बिघडले आहे.

मला १५ दिवसांपूर्वी कंपनीकडून मेल आला की, बंगळूर येथे बदली केली आहे. तिकडच्या युनिटमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे कारण त्यात दिले आहे. अचानक बदली झाल्याने माझे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे मी कंपनीला विनंती केली आहे की, बदली रद्द करावी. ते शक्य नसल्यास काही महिन्यांनंतर बंगळूरला पाठवावे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. माझ्या कंपनीतील अनेकांच्या बाबतीत असे झाल्याचे समजले.

- पवन कुमार, आयटीयन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com