पवार-जाचक नव्या पर्वाची १७ वर्षानंतर सुरूवात...

राजकुमार थोरात
Tuesday, 22 September 2020

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारामध्ये माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक सहभागी झाल्याने पवार-जाचक पर्वाची १७ वर्षानंतर नव्याने सुरवात असून संचालक मंडळाच्या बैठकीस व नवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसाठी जाचक यांनी आज मंगळवार (ता.२२) रोजी हजेरी लावली.

वालचंदनगर (पुणे) : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारामध्ये माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक सहभागी झाल्याने पवार-जाचक पर्वाची १७ वर्षानंतर नव्याने सुरवात असून संचालक मंडळाच्या बैठकीस व नवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसाठी जाचक यांनी आज मंगळवार (ता.२२) रोजी हजेरी लावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भवानीनगरचा साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून पवार कुंटुंबाच्या ताब्यात आहे. पवारांच्या विचाराचे संचालक मंडळ कारखान्यावरती कार्यरत असते. २००३ च्या सुमारास जाचक यांनी पवार कुंटुंबाशी काडीमोड घेवून २००४ साली थेट शरद पवार यांच्या विरोधातच लाेकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये जाचक यांचा सत्ताधारी संचालक मंडळाच्या पॅनेलच्या विरोधात निवडणूक लढवत होते. मात्र, जाचक यांना यश आले नाही. गेल्या काही महिन्यापासुन राष्ट्रवादी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी जाचक व पवार कुंटुंबामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

मुंबईमध्ये जाचक व शरद पवार यांची महत्वाची बैठक झाली. यानंतर जाचक यांनी पवार कुंटुंबासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकसह इतर दहा पदाच्या मुलाखती घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेवरुन जाचक यांना कारखान्याच्या संचालक मंडळाला निमंत्रित केले होते. दरम्यान जाचक हे बैठकीस उपस्थित राहिल्याने  कारखान्याचे माजी संचालक व भाजपचे जिल्हा सचिव  तानाजी थोरात, पांडुरंग कचरे, लालासाहेब सपकळ यांनी जाचक यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेवून संचालक मंडळाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

कोरोनामुळे सहायक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू

मात्र, संचालक मंडळाने त्यास दाद दिली नाही. यासंदर्भात कारखान्याचे विद्यामान अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, आजच्या बैठकीमध्ये कार्यकारी संचालकासह इतर अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अधिकारी व जाचक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जाचक यांचा सहकार व साखर कारखान्यातील अनुभवाचा फायदा कारखान्याना होणार असल्याचे त्यांना निमंत्रित केले असल्याचे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jachak's presence at the meeting of Chhatrapati factory