जैन संघटनेकडून जलसंधारण कामांसाठी दोन पोकलेन मशिन

संतोष आटोळे
सोमवार, 14 मे 2018

गावांनीही सक्रिय सहभाग घ्यावा - सुनेत्रा पवार
बारामती तालुक्यामध्ये पानी फाऊंडेशनच्या स्पर्धेच्या माध्यमातुन जलसंधारण कामांची चांगली चळवळ सुरु आहे.यामध्ये ग्रामस्थांनी शासकिय योजना, सामाजिक संस्था यांच्यासह स्वतासुध्दा सक्रिय सहभाग घ्यावा.त्यास सर्वोतोपरी सहकार्य करु.

शिर्सुफळ : कटफळ (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे सुरु आहेत या कामांना अधिक गतीयावी यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने दोन पोकलेन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, भारतीय जैन संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष आनंद छाजेड, सद्स्य राहुल शहा, यश मेहता, तालुका समन्वयक धोंडीबा कर्चे, मनिषा देसाई, सरपंच सारिका मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, पानी फाउंडेशन टिमचे प्रशिक्षणार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कटफळ गावाने यंदा पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात भाग घेतला आहे. या उपक्रमात श्रमदानातून विविध जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. त्यानुसार येथील ग्रामस्थांच्या माध्यमातुन  सलग समतल चर व बांधबंधिस्ती, माती नाले यांची कामे सुरु आहेत.

तसेच या उपक्रमाअंतर्गत काही कामे कठिण ठिकाणी असल्याने पोकलेन व जेसीबी मशिनद्वारे केली जात आहेत. यामध्ये शेततळे, बांधबधिस्ती व खोल सलग समतल चर या कामाचा समावेश आहे. याकामांना अधिक गती यावी यासाठी भारतीय जैन संघटनेने दोन पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे.

गावांनीही सक्रिय सहभाग घ्यावा - सुनेत्रा पवार
बारामती तालुक्यामध्ये पानी फाऊंडेशनच्या स्पर्धेच्या माध्यमातुन जलसंधारण कामांची चांगली चळवळ सुरु आहे.यामध्ये ग्रामस्थांनी शासकिय योजना, सामाजिक संस्था यांच्यासह स्वतासुध्दा सक्रिय सहभाग घ्यावा.त्यास सर्वोतोपरी सहकार्य करु.

भारतीय जैन संघटनेच्या वतीने बारामती तालुक्यातील पाणी फाउंडेशन उपक्रमातील 14 गावात जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी 25 पोकलेन 9 जेसीबी आत्तापर्यंत दिले आहेत. यामध्ये सदर गावात पोकलेन 100 तास तर जेसीबी 250 तास जलसंधारणाचे काम करणार आहे. तसेच एखाद्या गावाने जास्त तास मशिन मागितल्यास त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे संबंधित गावानी एकत्रित येवून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करणे गरजेच आहे. म्हणजे भविष्यात गाव टॅंकरमुक्त होवून पाणीदार होण्यास मदत होईल." 
- आनंद छाजेड (विभागीय उपाध्यक्ष भारतीय जैन संघटना)

Web Title: jain community help for drought situation