esakal | बारामती : जैन देवस्थान, बारामती इंडस्ट्रीज झाले अन्नदाता

बोलून बातमी शोधा

bara.jpg

लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असलेल्या विविध घटकांना मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. बारामतीतील श्री मुनिसुव्रतनाथ महाराज दिगंबर जैन देवस्थान यांच्यासह बारामती इंडस्ट्रीज यांच्या वतीने आजपर्यंत तब्बल 50 हजार जेवणाचे डबे गेल्या दोन महिन्यात पुरविले गेले.

बारामती : जैन देवस्थान, बारामती इंडस्ट्रीज झाले अन्नदाता
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती  : लॉकडाऊनच्या काळात हातावरचे पोट असलेल्या विविध घटकांना मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. बारामतीतील श्री मुनिसुव्रतनाथ महाराज दिगंबर जैन देवस्थान यांच्यासह बारामती इंडस्ट्रीज यांच्या वतीने आजपर्यंत तब्बल 50 हजार जेवणाचे डबे गेल्या दोन महिन्यात पुरविले गेले. याच्यामध्ये सकाळचे जेवण दिगबंर जैन देवस्थानच्या वतीने तर संध्याकाळचे जेवण बारामती इंडस्ट्रीजच्या वतीने केले गेले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

येथील श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थानच्या वतीने गरजू नागरीक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात आले. बारामती शहरात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून कठोर पावले टाकण्यात आली होती. या परिस्थितीत शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि गरजू नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बारामतीतील देवस्थानच्या वतीने मोफत अन्नदानाचा उपक्रम केला गेला.

या उपक्रमांतर्गत बारामती शहरातील नगरपरिषद, एमआयडीसीत बाहेरून आलेले कामगार, गरजू नागरीक अशा समाजातील विविध घटकांना मोफत आणि मुबलक जेवण पुरवण्यात येत आहे. 

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?

देवस्थानचे सर्व प्रमुख, मार्गदर्शक तसेच समाज बांधवांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून अधिकाधिक गरजू लोकांना यांचा फायदा व्हावा यासाठी देवस्थान प्रयत्नशील आहे. हे संपूर्ण जेवण योगेश सावंत यांच्या निदर्शनाखाली बनवून ते वितरीत करण्याची जबाबदारी गणेश पाठक आणि योगेश कांबळे हे पार पाडत आहेत.

बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार अडकले होते,  या कामगारांच्या जेवणाचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बारामती इंडस्ट्रीज प्रा. लि. चे संचालक सचिन उर्फ निलेश कुलकर्णी यांनी येथे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांच्या एक वेळच्या जेवणाची सोय केली. बारामती एमआयडीसीमध्ये कामाच्या निमित्ताने अनेक परप्रांतीय कामगार आहेत. येथील कामगारांचे जेवणाचे हाल होऊ लागले आहेत. त्यांचे चालक धनंजय ठोंबरे हे या कामगारांना थेट एमआयडीसीत जाऊन जेवण पोहोचवत होते.