Corona Virus : ...म्हणून जैन सकल संघ परिवाराचे अन्न वितरण तूर्त स्थगित

Jain sakal Union family stopped food distribution due to seal few places in city
Jain sakal Union family stopped food distribution due to seal few places in city

पुणे : गेली दहा दिवस पुणे शहर परिसरातील विद्यार्थी, अपंग, कामगार आणि गरजू नागरिकांना अन्न पुरवठा करणाऱ्या जैन सकल संघ परिवाराने अन्न वितरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही भाग सील केल्याने वितरणात अडथळा येत असल्याने त्यांनी वितरण थांबविले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जैन समाजाचे महावीर प्रतिष्ठान, सकल जैन परिवार, महावीर जैन विद्यालय यांसह अनेक स्वयंसेवी गटांमार्फत विद्यार्थी आणि गरजूंना अन्न वितरण केले जात होते. आतापर्यंत तीस हजार जणांना त्यांनी अन्नाच्या पाकिटांचे वितरण केले आहे. मात्र प्रशासनाने शहरातील काही भाग सील केल्याने पोलिस यंत्रणेकडून कुणावरही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून अन्न वितरण थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा सकाळशी बोलताना म्हणाले, "विद्यार्थी आणि गरजूंसाठी सॅलिसबरी पार्क येथून वाहने भरून शहराच्या विविध भागांत स्वयंसेवक अन्न वितरणासाठी जात होते. शहरातील पेठांचा भाग, वाकडेवाडी, कात्रज, शहराचा मध्यवर्ती भाग या ठिकाणी अन्नाची पाकिटे गरजूंना वितरित केली जात होती. आता त्यावर बंधने येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तूर्त अन्न वाटप आम्ही थांबवत आहोत."
"शहरातील काही भाग सील केलेला आहे. या काळात अन्न वितरणासाठी बाहेर पडणाऱ्या स्वयंसेवकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तेही धास्तावले आहेत. म्हणूनच हा उपक्रम तूर्त बंद ठेवण्यात येत आहे. परंतु शहरातील परिस्थिती निवळल्यानंतर अन्नदानाचे हे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात येईल," असे शहा यांनी स्पष्ट केले.

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

युवराज शहा म्हणाले, "गेल्या काही दिवसांत अन्न वितरणावेळी वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळाले. पण काही भागात खटला भरण्याची तंबी स्वयंसेवकांनी देण्यात आली होती. पण आता प्रशासनाने अन्न वितरणासाठी सुरळीत व्यवस्था आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध केल्यास आम्ही ही जनसेवा पुन्हा सुरू करू."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com