जलसमाधी घेण्याचा इशारा

जलसमाधी घेण्याचा इशारा

आंबेठाण - आता खूप निवेदने झाली, खूप आश्वासने झाली. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार करीत भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी भामा आसखेड धरणावर सुरू असलेले जॅकवेलचे काम बंद पाडले. जर काम सुरू केले तर याच पाण्यात जलसमाधी घेऊ, असा इशाराही दिला आहे.

काम बंद करण्यापूर्वी आंदोलकांची 
करंजविहिरे येथे बैठक झाली. या बैठकीला पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, बळवंत डांगले, सत्यवान नवले, संजय देशमुख, उपसरपंच किसन नवले, गजानन कुडेकर, दत्ता रौंधळ, माजी सरपंच किसन नवले, शांताराम शिवेकर, बाळासाहेब पापळ, दत्ता होले, अरुण रौंधळ, तुकाराम शिवेकर, गणेश जाधव यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

बैठकीनंतर आंदोलकांनी भामा आसखेड धरणाच्या जलाशयात सुरू असणाऱ्या पुणे जलवाहिनीच्या सुरू असणाऱ्या जॅकवेलच्या ठिकाणी जाऊन कामगारांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून कामगारांनी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी बंद केल्या. आंदोलकांनी अतिशय शांततेच्या मार्गाने धरणावर जाऊन मागण्या मांडल्या. दरमहा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत होणारी प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मागण्यांबाबतची बैठक नियमाने सुरू राहावी आणि जमीन वाटप सुरू करावे, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.

आमचे पुनर्वसन तत्काळ  झाले पाहिजे. न्यायालयाने  दिलेला आदेश सरकारने पाळला पाहिजे आणि तत्काळ जमीन वाटप सुरू केले पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या पॅकेजला आमचा विरोध आहे. प्रांताधिकाऱ्यांनी २० तारखेपासून जमीन वाटप सुरू करू, असे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही.
- चांगदेव शिवेकर, पंचायत समिती सदस्य व प्रकल्पग्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com