esakal | बीएचआर प्रकरणात जळगावच्या आमदाराचाही सहभाग?
sakal

बोलून बातमी शोधा

BHR

बीएचआर प्रकरणात जळगावच्या आमदाराचाही सहभाग?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांचे नाव संशयित आरोपी म्हणून पुढे आले आहे. गेल्या महिन्यात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. तेव्हापासून ते फरार आहेत.

या प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहर, जामनेर, भुसावळ औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या सहा जिल्ह्यात ऐकाचवेळी छापेमारी करत तब्बल बारा जणांना अटक केली होती. त्यावेळीच पटेल यांच्याविरोधात अटक वारँट काढण्यात आले होते.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड मधील मतदार छायाचित्रांबाबत उदासीन

गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या कावाईत सराफ व हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव), जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा.धुळे), अंबादास आबाजी मानकामे (रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या १२ जणांना अटक झाली होती. त्यातच आमदार चंदुलाल पटेल यांच्याविरोधात देखील अटक वारँट निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र खंदारेला यांना देखील नुकतीच अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: #DilipKumar : रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला!

''बीएचआर प्रकरणी पुणे पोलिसांनी एकावेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना अटक केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या कारवाईत चंदुलाल पटेल यांच्या विरोधातही अटक वॉरंट निघाले होते. मात्र या प्रकरणात ते फरार आहेत.''

- भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे व सायबर

loading image