Crime-Scene
Crime-Scene

अटकेसाठी पोलिसांवर पालकमंत्र्यांचा दबाव - शिंदे

पुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या मुलाला त्रास दिल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

जलपर्णीच्या निविदाप्रकरणी शिंदे यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौरांच्या दालनात आंदोलन केले. तेव्हा अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण झाल्याने शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी पोलिसांना हाताशी धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. ही बाब प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कानावर घातली असून, त्यानंतर चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे.' दरम्यान, भाजपने याबाबत काही प्रतिक्रिया दिली नाही.

निंबाळकर, पोळ यांच्या अटकेची मागणी
जलपर्णी काढण्याचा बनाव करून पुणेकरांचे 23 कोटी लुबाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर व वाहन खात्याचे प्रमुख किशोर पोळ यांच्याविरोधात शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते म. वि. अकोलकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अकोलकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com