पुणे - पर्यावरणप्रेमी काढताहेत पवनातील जलपर्णी

 रमेश मोरे
सोमवार, 23 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी व जलपर्णी हा सांगवीकरांचा नेहमीचा प्रश्न यावर्षीही जलपर्णीमुळे वाढलेल्या डास किटकांचा जुनी सांगवी परिसरातील नागरीकांना सामना करावा लागत आहे.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी व जलपर्णी हा सांगवीकरांचा नेहमीचा प्रश्न यावर्षीही जलपर्णीमुळे वाढलेल्या डास किटकांचा जुनी सांगवी परिसरातील नागरीकांना सामना करावा लागत आहे.

महापालिकेची अपुरी यंत्रणा व गेली तीन महिन्यांपासुन केलेले दुर्लक्ष व वेळकाढुपणामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. शहरातील पर्यावरण प्रेमी संस्थांनी एकत्र येवुन काही दिवसांपुर्वी पवना नदी पात्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल ते पवना दशक्रिया घाट येथील जलपर्णी मनुष्य बळ,छोट्या नौकाद्वारे काढली होती. यामुळे सांगवीकरांना काहिसा दिलासा मिळाला होता.पुन्हा या पात्रात जलपर्णी वाढु लागल्याने पर्यावरण प्रेमींनी  सोमवार ता.२३ जलपर्णी काढण्याच्या कामास सुरूवात केली आहे.पर्यावरण मित्रांच्या वतीने नागरीकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते.प्रशासनाची वाट न पहाता जलपर्णी काढण्याचे काम या स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते करत आहेत.तर महापालिकेच्या वतीने मुळा नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम एका यांत्रिक बोट व जेसीबीच्या साहाय्याने सुरू आहे.पवना नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी रोटरी क्लब,

जलपर्णी अभ्यासक व सामाजिक  कार्यकर्ते सोमनाथ मुसूडगे व राजू सावळे पर्यावरण (मनसे शहर उपाध्यक्ष ) रोटरी कल्ब वाल्हेकरवाडी व  इतर सामाजिक संस्था यांच्या  मार्गदर्शनाखाली  मोहीम सुरू करण्यात आली आहे. साई स्नेहल पार्क, निखिल कदम, आनंद भूजंग, परीक्षित कुलकर्णी,तुषार लिंबोरे,प्रथमेश घोलप,प्रवीण कोकाटे, गणेश काची आदी तीस जणांनी यात सहभाग घेतला आहे.स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना थंड पाणी व चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे.फोटो ओळ-जुनी सांगवी येथील पवना नदीपात्रातील जलपर्णी काढताना पर्यावरण प्रेमी.

Web Title: jalparni removed by environmentalist