यंदा लवकरच जांभळाची आवक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - रानमेवा म्हणून ओळखला जाणाऱ्या जांभळाची या वर्षी बाजारात लवकर आवक झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 70 ते 80 किलो इतकी जांभळे बाजारात आली आहेत. 

पुणे - रानमेवा म्हणून ओळखला जाणाऱ्या जांभळाची या वर्षी बाजारात लवकर आवक झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 70 ते 80 किलो इतकी जांभळे बाजारात आली आहेत. 

चवीला आंबट गोड, गडद जांभळा रंग असलेल्या जांभळाच्या पाट्या बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यावधीनंतर जांभळाची आवक सुरू होत असते. या वर्षी अनुकूल हवामानामुळे उत्पादन लवकर हाती आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी या गावातील शेतकरी रामचंद्र गावकर यांच्या शेतातील जांभळाची बाजारात आवक झाली. जांभळाची प्रत चांगली असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून त्यास मागणी आहे. हंगामातील पहिलीच आवक असल्याने खरेदीदारांकडून उत्साह दाखविण्यात आला. 

खरेदीदार नामदेव साळुंके आणि अनिल ससाणे यांनी प्रतिकिलो 150 ते 180 रुपये या भावांत माल खरेदी केला. पुण्याच्या बाजारात पुणे विभागासह कोकणातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, वरस, कसाळ, बांदा या कोकणातील गावातून दरवर्षी आवक होत असते. पुढील काही दिवस जांभळाची आवक तुरळक राहील. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवकेत वाढ झाल्यानंतर भावही उतरतील. जांभळाचा हंगाम जून महिन्याखेरपर्यंत सुरू राहील, असे व्यापारी अजित घुले यांनी सांगितले. 

Web Title: jambul in market