जन आहार केंद्र बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - रेल्वे प्रवाशांसाठी स्वस्त दरात जेवण मिळण्याची उत्तम सोय म्हणजे रेल्वे स्टेशनवरील जन आहार केंद्र. अगदी पंधरा रुपयांत पोट भरू शकणारी... अनेक कष्टकरी, गरीब प्रवाशांचा मोठा आधार असलेली पुणे स्टेशनवरील ‘जन आहार’ योजनाच मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. दररोज साधारण एक लाख प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करतात.

गेल्या तीन महिन्यांपासून जन आहारचे दुकान बंद असल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या योजनेचे काम रेल्वे विभागाकडून सहा महिन्यांपूर्वीच ‘आयआरसीटीसी’ विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘आयआरसीटीसी’ विभागाचे क्षेत्रीय अधिकारी गुरुराज सोन्ना यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी या आहार केंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला तसेच जन आहार केंद्राची दुरुस्ती व रंगकाम नुकतेच पूर्ण झाले असून, लवकरच हे केंद्र सुरू होईल, असे सांगितले.

मागील दोन महिन्यांत मी तीन-चार वेळा प्रवास करताना जन आहार केंद्रावर गेलो होतो. मात्र, ती खिडकी बंद होती. स्टेशन प्रबंधकांकडे चौकशी केली असता त्यांनी मला प्लॅटफॉर्मवरील रेल ढाबा व कृष्णाज या दुकानात जन आहार मिळेल, असे सांगितले; परंतु तिथेही मला जन आहार मिळाला नाही.  
- जितरत्न, प्रवासी

Web Title: Jan aahar Center Closed