esakal | बुमराह झाला पुण्याचा जावई; संजनापेक्षा वयाने लहान
sakal

बोलून बातमी शोधा

bumrah sanjana

भारताचा वेगवान गोलंदाज आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. 

बुमराह झाला पुण्याचा जावई; संजनापेक्षा वयाने लहान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - भारताचा वेगवान गोलंदाज आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाह सोहळ्याला काही मोजकेच लोक उपस्थित होते. कोरोनामुळे जवळच्या लोकांना बोलावलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्याही लग्नाची चर्चा जोरदार होत होती. गोव्यात हा विवाह सोहळा पार पडला. स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन ही आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ते आयपीएलची होस्टही होती. 

पुण्यात जन्म आणि शिक्षण
संजना गणेशनपेक्षा बुमराह वयाने लहान आहे. बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 ला तर संजनाचा जन्म पुण्यात जन्म पुण्यात 6 मे 1991 ला झाला. संजनाचे वडील गणेशन रामास्वामी मॅनेजमेंट गुरु आणि एक लेखक आहेत. तसंच आई डॉक्टर सुषमा गणेशन या वकील आणि फिटनेस कोच आहेत. संजनाचं शालेय शिक्षण पुण्यातील बिशप स्कूलमध्ये झालं. त्यानंतर 2008 मध्ये सिम्बॉयसिसमधून तिने बी टेक पूर्ण केलं. सिम्बॉयसिसमध्ये संजनाने सुवर्णपदक पटकाववलं होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आयटी आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी जॉइन केली. 2013 ते 2014 या कालावधीत संजना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.

मॉडेलिंग ते अँकरिंग
2014 मध्ये संजनाने स्प्लिट्सव्हिला 7 या शोमध्ये भाग घेतला होता. पण हा शो तिला पूर्ण करता आला नव्हता. मॉडेलिंगमध्येही संजनाने करिअर करण्याचा प्रयत्न केला. 2013 मध्ये संजनाने फेमिना मिस इंडिया पुणे मध्ये भाग घेतला होता. यामध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या संजनाला विजेतेपद मात्र पटकावता आलं नव्हतं. 2016 मध्ये संजना अँकरिंग करायला लागली. यावेळी तिने स्टार स्पोर्ट्ससोबत काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून संजना स्पोर्ट्स अँकरिंग करत आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळांच्या स्पर्धेतही ती अँकरिंग करताना दिसते. 

हे वाचा - अखेर बुमराहचं शुभमंगल; संजनासोबत घेतले सात फेरे

अश्विनी कौलसोबत होती रिलेशनशिपमध्ये
स्प्लिट्सव्हीला शोमधील जोडीदार अश्विनी कौलसोबत संजना रिलेशनशिपमध्ये होती. या शोनंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही खूप होत होत्या. मात्र संजनाला दुखापत झाल्यानं शो अर्ध्यातून सोडावा लागला होता. शेवटी अश्विनी कौलसुद्धा शोमधून बाहेर पडला. संजना आणि अश्विनी यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचा ब्रेकअप जाला. 

loading image
go to top