लढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'

पांडुरंग सरोदे 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी होऊनही भारतीय लष्करी जवान आजही तितकेच खंबीर आहेत. रविवारी बालेवाडीमध्ये झालेल्या "पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये हेच जवान आपल्या व्हिलचेअरवरुन आले, मॅरेथॉनमध्ये ते चक्क धावले. केवळ एवढेच नाही, तर आपल्या आयुष्यालाही "लव्ह यु जिंदगी' म्हणत त्यांनी अस्सल पंजाबी भांगड्यावर ताल धरला. व्हिलचेअरवरच कधी स्वतःभोवती गिरकी घेत, ठुमके लगावत, तर खास अदाकारी करत त्यांनी पुणेकरांची मने जिंकली. 
 
पोलिस बॅंडवर वाजणाऱ्या "बापू सेहत के लिए तु तो हानीकारक है' या गाण्यावर तर त्यांनी चांगलाच ठेका धरला. खर तर देशासाठी स्वतःच्या जीवचा विचार न करता, लढा दिलेल्या या दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या जवानां स्पर्धक पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले. केवळ एवढेच नाही, तर सेलिब्रेटींनी त्यांच्याबरोबर ताल धरत खास सेल्फीही काढल्या. खर तर डोंगराएवढ्या संकटांशी दोन हात करुन आलेल्या जवानांचे जगण्यावरील प्रेम पाहताना, त्यांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद बघताना अक्षरशः ऊर भरून येत होता, त्यांचा अभिमान वाटत होता.

Web Title: Jawans of war shows spirit to Love life in Pune half marathon